Marathi shayari [Best Shayari in Marathi]

Marathi shayari

जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा

 

तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

 

हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला,
कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.

Marathi shayari

प्रेम कधी नाही विचारत कि कुठून आहेस तू
ते फक्त म्हणते कि माझ्याच हृदयात राहतेस तू.

 

फुलाच्या वासाला चोरतायेत नाही,
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली,
पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही

 

पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

 

किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत,
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत

Marathi shayari

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.

 

प्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू ?
ते फक्त म्हणते कि माझ्या हृदयाची
स्पंदने चालवतेस तू.

 

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.

 

आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई

 

माझी कविता वाचताना नेहमी डोळे गळतात,
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या जीवनाशी जुळतात.

Marathi shayari

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.

 

तुझी आणि माझी मैत्री अशी आशावी,
काटा तुला लागला तर कल माला यावी

Share and comment how you liked these Marathi shayari.

  About Shayari Status SMS 335 Articles
  ShayariStatusSMS is a leading website which share latest and largest Shayari, Status, and SMS Messages with their readers. Bookmark this website and keep visiting for latest shayari.

  Be the first to comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.


  *